ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
| जगन्माता देवी पार्वती अर्थात दऱ्याबाई नावाने प्रसिद्ध असलेले व तिच्या वास्तव्याने पुनीत झालेले चारी बाजूने निसर्ग सौंदर्याने नटलेले दरी हे गाव नाशिक पासून १६ किलो मीटर अंतरावर वसलेले आहे. शुद्ध व स्वच्छ हवा व भरपूर पाणी अशी नैसर्गिक देणगी लाभलेली आहे. डोंगराच्या कुशीत टुमदार पणे मोठ्या डौलात वसलेले आहे. उत्तर दिशेला आळंदी नदी असून नदीवर मोठे धारण आहे. गावाच्या कुशीत दऱ्या बाई देवीचे मंदीर आहे. म्हणून या गावाचे नाव दरी असे पडलेले आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला गावात यात्रा भरते सर्व ग्रामस्थ व परिसरातील लोक यात्रेत सहभागी होतात. व तसेच रात्रीच्या वेळी गावात सांस्कृतिक कार्यक्रम होतात. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ९७१.५८ हेक्टर आहेत. त्या पैकी लागवडी खालील क्षेत्र ६४६ हे.आहे. ग्रामपंचायत मालकीचे २६६.३६ हे.क्षेत्र आहेत. सदर क्षेत्रात केंद्र शासनाच्या हरियाली पाणलोट योजने अंतर्गत वृक्ष लागवड, सिमेंट बंधारे, दगडी बांध, चार खोडणे ई. पानलोटाची कामे केलेली आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती व शेतमजुरी करणे हा आहे. तसेच शेळी पालन व कुकुट पालन हे शेती पूरक व्यवसाय केले जातात. गावातील मुख्य पिके द्राक्ष, टोमॅटो,भाजीपाला,भात,गहू, घेतली जातात. |
ग्रामपंचायत माहिती
प्रशासनिक माहिती
गावाचे नाव: दरी
तालुका: नाशिक
जिल्हा: नाशिक
राज्य: महाराष्ट्र
ग्रामपंचायतीचा प्रकार: स्वयंपूर्ण ग्रामपंचायत
सदस्यसंख्या व रचना
सरपंच
उपसरपंच
ग्रामपंचायत सदस्य (सुमारे 7 ते 9)
ग्रामसेवक (शासकीय अधिकारी)
प्रशासनिक अधिकारक्षेत्र
गावाची मूलभूत पायाभूत सुविधा
स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि सार्वजनिक सोयी
ग्रामसभा आयोजन
सरकारी योजना राबवणूक
कर व नोंदी व्यवस्थापन
शेती व भू-वापर माहिती
१. भौगोलिक क्षेत्र ९७१ हे.
२. बागायती क्षेत्र ५२९ हे.
३. सरकारी क्षेत्र २६६ हे.
४. जिरायती क्षेत्र १७६ हे.
ग्रामपंचायतिच्या मालकीच्या जमिनी
१ ) गायरान :- होय
२ ) मैदान :- होय
आरोग्य
१) आरोग्य केंद्र :- आरोग्य उपकेंद्र दरी
२) खाजगी दवाखाने :- १
शिक्षण, प्रशिक्षण, सुविधा
१ ) अंगणवाडी :- १
२) प्राथमिक शाळा :- जि.प.शाळा दरी
३) माध्यमिक शाळा :- डॉ बळीराम हिरे आदिवासी विद्यालय दरी
४) कनिष्ठ महाविद्यालय :- डॉ बळीराम हिरे आदिवासी विद्यालय दरी
प्राथमिक शाळा :-
जिल्हा परिषद शाळा १ ली ते ४ वी , तुकड्या ४
विद्यार्थी संख्या :- ७९
वस्तीगृह :- ०१ विद्यार्थी संख्या २९
माध्यमिक शाळा :- ०१ विद्यार्थी संख्या ३३१
कनिष्ठमहाविद्यालय :- ०१ विद्यार्थी संख्या ११०
पदवी महाविद्यालय :- नाशिक येथे १७ कि .मी बस व खासगी वाहन,
प्राथमिक शाळा :-
घरांची संख्या :- कच्ची घरे पक्की घरे शासकीय इमारती शा.योजनेची घरे २२ २१३ २६ १२१
घरांची संख्या
|
कच्ची घरे |
पक्की घरे |
शासकीय इमारती |
शा.योजनेची घरे |
|
२२ |
२१३ |
२६ |
१२१ |
पिण्याचे पाणी
१) स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना
२)हातपंप :- ०२
३) पाच वर्षात एकही पाणीनमुना दुषित नाही. ( हिरवे कार्ड )
५) जैविक व रासायनिक तपासणी अहवाल पिण्यास योग्य अहवाल
अंगणवाडी , शाळा, आश्रम शाळा, वस्तीग्रह, कनिष्ठ महाविद्यालय यांना ग्रामपंचायतीचे नळ
१७२ कनेक्शन देण्यात आले आहे.
गावातील / शिवारातील उद्योग / कृषी प्रक्रिया उद्योग
हॉटेल व्यवसाय ,
1. दुग्ध व्यवसाय,
2. शेळी पालन ,
3. कुकुटपालन
गावातील समाज मंदिर :-०१
सामाजिक सभाग्रह :-१
गावातील सांडपाणी ,घनकचरा व्यवस्थापनाचे सध्या स्थिती :
अ) गावातील सांडपाणी :- गावात १०० % भूमिगत गटार (४७० मीटर भुमिगत गटार )
ब) घनकचरा व्यवस्थापन:- घनकचरा व्यवस्थापनासाठी ०४ कंपोस्ट टाक्या बांधल्या आहेत
पुरस्कार
१) निर्मल ग्राम पुरस्कार सन २००७
२) पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतंर्गत सन २०१० -११
३) यशवंत पंचायत राज अभियान २०१४ सन २०१२ -१३
४) पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन
योजना पंचायत सशक्तीकरण पुरस्कार सन २०१२ -२०१३
५) यशवंत पंचायतराज अभियान २०१५ सन २०१३-१४
६) राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान पंचायत सशक्तीकरण पुरस्कार सन २०१३ - २०१४
७) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०१६ -१७ तृतीय पारितोषिक
८) पंडितदिन दयाळ उपाध्याय पुरस्कार सन २०२१ - २२
९) आर आर (आबा) सुंदर गाव पुरस्कार सन २०२२ - २३
१०) माझी वसुंधरा अिभयान ४.० विभागस्तरीय प्रथम पुरस्कार सन २०२३ -२४
११) महात्मा गांधी तंटा मुक्त गाव प्रथम क्रमाकांचे पारितोषिक
१२) गौरव ग्रामसभा
अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
1252
ग्रामस्तरीय कर्मचारी
*ग्रामपंचायत विभाग*
*ग्रामपंचायत विभाग*
| अ.क्र | पदाधिकारी / कर्मचारी यांचे नावं | पदाधिकारी |
|---|---|---|
| १) | श्री. सोपान शंकर चारस्कर | |
| २) | श्री. रामनाथ सखाराम होडे | |
| ३) | श्री. विक्रम केशव रेहरे | |
| ४) | ||
| ५) | ||
| ६) |
ग्रामस्तरीय कर्मचारी
| अ.क्र. | प्रा.शिक्षकाचे नावं | पद |
|---|---|---|
| १) | ||
| २) |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना